TFGBV Toolkit (Spoken Marathi | मराठी - प्रमाण लेखन)

तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी लिंग-आधारित हिंसा (टीएफजीबीव्ही) म्हणजे महिला आणि मुलींना त्रास देण्यासाठी, त्यांच्यावर हिंसा करण्यासाठी किंवा त्यांच्यावरील हिंसा आणखी वाढवण्यासाठी मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करणे. भारतात ही समस्या हळूहळू वाढत आहे, विशेषतः ज्या शहरांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आणि इंटरनेट वापरतात.

हे टूलकिट तंत्रज्ञानाच्या मदतीने होणाऱ्या त्रासाला किंवा हिंसेला कसं हाताळायचं यासाठी मार्गदर्शन करतं. यात प्रत्यक्ष मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी उपयोगी माहिती, त्रास झालेल्या व्यक्तीशी संवेदनशीलपणे कसं बोलायचं आणि डिजिटल पुरावे कसे जतन करायचे याबद्दल मार्गदर्शन दिलं आहे. हे टूलकिट संपूर्ण भारतात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी उपयोगी आहे. मात्र मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये काम करणाऱ्यांसाठी काही विशेष सूचना दिल्या आहेत.

हे टूलकिट सध्या हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये उपलब्ध आहे.
Retake this course?
Retaking this course from the beginning will reset all of your tracked progress.
Retake