दिल्लीमध्ये मदत मिळवण्यासाठीची ठिकाणे

शक्ती शालिनी हेल्पलाइन: भारतात कुठेही असलेल्या हिंसाचाराचा सामना करणाऱ्या व्यक्तींना संवेदनशील, गोपनीय आणि वेळेवर मदत मिळते.

फोन: +९१ ११२४३ ७३७३७ वर फोन करा किंवा व्हॉट्सॲपवर +९१ ७८३८९ ५७८१० वर मेसेज करा.

वेळ: २४ तास, आठवड्याचे सातही दिवस.

नझरिया हेल्पलाइन: हिंसाचाराचा सामना करणाऱ्या क्विअर महिला आणि ट्रान्स व्यक्तींना फोनवर किंवा प्रत्यक्ष समुपदेशन आणि मदत मिळते. इथल्या टीमला अशाच अनुभवातून गेलेल्या व्यक्तींना आधार देण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलेलं आहे.

फोन: +९१ ९८१८१ ५१७०७

वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत.

दिल्ली कमिशन फॉर वुमन रेप क्रायसिस सेल: बलात्काराच्या प्रकरणातील महिलांना अनुभवी वकिलांकडून मोफत कायदेशीर मदत मिळते. कोर्टाच्या प्रकरणात सरकारी वकिलाला मदत करणे, आरोपीला जामीन मिळू नये यासाठी मदत करणे आणि जबाब नोंदवण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करणे अशी मदत मिळते.

फोन: +९१ ११२३३ ७०५५७ वर फोन करा.

वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी ९:३० ते संध्याकाळी ६:००.

TFGBV-विषयक संसाधने:

Meri Trustline: ऑनलाइन सेफ्टीसाठी RATI Foundation ची मोफत आणि गुप्त हेल्पलाइन. सायबरबुलिंग, ऑनलाइन त्रास, ग्रूमिंग किंवा प्रायव्हेट फोटो परवानगीशिवाय शेअर झाल्यास महिला, मुलं आणि वंचित समुदायांना मदत मिळते.

हेल्पलाइन नंबर (कॉल किंवा WhatsApp): +91 63631 76363

वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी 9 ते संध्याकाळी 5

TechSakhi: महिला, मुली, नॉन-बायनरी, ट्रान्स आणि क्विअर व्यक्तींना कायदेशीर मदत, काउन्सेलिंग आणि डिजिटल सेफ्टीसाठी मदत देणारा मोफत उपक्रम.

हेल्पलाइन नंबर (कॉल किंवा WhatsApp): +91 80456 85001

वेळ: सोमवार ते शुक्रवार, सकाळी 9 ते संध्याकाळी 7

Digital Safe India: परवानगीशिवाय अंतरंग फोटो शेअर होणे, डीपफेक किंवा डिजिटल शोषण झाल्यास तातडीची मदत आणि कंटेंट काढण्यासाठी मदत. फॉर्म भरून तक्रार करता येते आणि 24 तासांच्या आत लवकर प्रतिसाद मिळतो.

वेळ: 24/7

संपूर्ण भारतात मदत मिळवण्यासाठी हेल्पलाइन

AKS Crisis Line: लिंगाधारित हिंसेतून वाचलेल्या सगळ्या व्यक्तींना मदत करते—उदा. महिलांवरील घरगुती हिंसा, कुटुंबातील अत्याचार, लैंगिक हल्ला, लैंगिक छळ, बाल अत्याचार, स्टॉकिंग आणि TFGBV. मदत करणाऱ्यांना काउन्सेलिंग आणि क्रायसिस मॅनेजमेंटचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि कॉल करणाऱ्यांना गोपनीय मदत मिळते.

हेल्पलाइन नंबर (कॉल): +918793088814

वेळ: 24/7

भाषा: इंग्रजी, मराठी, हिंदी

NCW महिला हेल्पलाइन: National Commission for Women ची ही हेल्पलाइन वेगवेगळ्या अडचणींमध्ये असलेल्या महिलांना मदत करते. घरगुती हिंसा, लैंगिक छळ, सायबर क्राइम किंवा मानसिक त्रास अशा विषयांवर 24 तास काउन्सेलिंग, कायदेशीर मदत आणि मार्गदर्शन मिळतं. गरज असल्यास पोलिस, One Stop Centre, हॉस्पिटल किंवा इतर अधिकाऱ्यांशी जोडून दिलं जातं.

हेल्पलाइन नंबर: 14490

वेळ: 24/7

भाषा: इंग्रजी, हिंदी

Dhawani - National Domestic Violence Hotline: घरगुती हिंसा किंवा अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तींना जज न करता मदत करण्यासाठी सुरक्षित जागा देते. पूर्ण मदत आणि सर्व्हायव्हरला केंद्रस्थानी ठेवून प्रक्रिया केली जाते.

हेल्पलाइन नंबर: कॉल किंवा WhatsApp +91 98408 88882

वेळ: 24/7

भाषा: इंग्रजी, हिंदी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू